विटा : विटा पालिकेच्या विविध विषय समित्यांच्या निवडी नुकत्याच पार पडल्या. यांत बांधकाम समिती सभापतिपदी श्रीकांत साळुंखे, तर शिक्षण समितीवर लीला भिंगारदेवे यांची वर्णी लागली. यावेळी नगराध्यक्षा काजल म्हेत्रे सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या. उपनगराध्यक्ष अमोल बाबर यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.
आरोग्य समिती भालचंद्र कांबळे यांना, तर पाणी पुरवठा विभाग सुरेश पवार यांच्याकडे आला आहे. महिला बालकल्याण समितीवर अपर्णा पाटील यांना संधी मिळाली आहे, तर नियोजन समिती अध्यक्षपदी उपनगराध्यक्ष अमोल बाबर हे पदसिद्ध अध्यक्ष असतील. स्थायी समितीवर सदस्य म्हणून रूपाली पाटील, वनीता शितोळे आणि नंदकुमार पाटील यांना संधी मिळाली आहे. या बैठकीत बांधकाम समिती सभापती पदावर श्रीकांत साळुंखे यांची निवड झाली. या समितीत नगरसेविका दीपा चोथे, रूपाली गेटकरी, नंदकुमार पाटील, विशाल तारळेकर आणि अजित गायकवाड यांची वर्णी लागली. शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक कार्य समिती सभापती पदावर लीला भिंगारदेवे यांची वर्णी लागली. या समितीत नगरसेवक वैभव ग्हेत्रे, विनोद गुळवणी, दीपा चोथे, रसिका सपकाळ आणि सुमित गायकवाड यांची निवड झाली आहे. स्वच्छता आणि आरोग्य समितीवर भालचंद्र कांबळे यांना सभापती म्हणून संधी मिळाली आहे.
या समितीत नगरसेवक संजय भिंगारदेवे, विशाल तारळेकर, विनोद गुळवणी, शीला लिपारे, अजित गायकवाड यांना स्थान गिळाले आहे. पाणी पुरवठा समितीच्या सभापतीपदी सुरेश पवार यांची निवड झाली. या समितीत नगरसेवक प्रीती पवार, रसिका सपकाळ, रूपाली पाटील, विनोद गुळवणी आणि सुमित गायकवाड यांची निवड झाली. नियोजन आणि विकास समिती सभापतीपदावर उपनगराध्यक्ष अमोल बाबर पदसिद्ध सभापती असतील. या समितीत नगरसेवक विशाल तारळेकर, उज्ज्वला सूर्यवंशी, वनिता शितोळे, कृष्णात गायकवाड आणि प्रतिभा पाटील यांची निवड झाली. महिला आणि बालकल्याण समिती सभापती म्हणून अपर्णा रणजित पाटील यांची निवड झाली.