आमदार सुहास बाबर File Photo
सांगली

Suhas Babar| उगाच कागदी घोडे नाचवू नका

आ. बाबर : विटा येथे खानापूर तालुका दुष्काळी आढावा बैठक

पुढारी वृत्तसेवा

विटा : सर्वांनी मिळून दुष्काळाच्या संकटाचा सामना करायचा असून मला उगाच कागदी घोडे नाचवून दाखवू नका, अशा शब्दांत आमदार सुहास बाबर यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली.

खानापूर तालुक्याची दुष्काळी आढावा बैठक आमदार सुहास बाबर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. प्रशासकीय कार्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या बैठकीस प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल, तहसीलदार योगेश टोम्पे, सभापती सुवर्णा भोसले, उपसभापती सुहास शिंदे, जि.प. सदस्या डॉ. शीतल बाबर, ॲड. सई शिंदे, मनीषा बागल आणि गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी शेतकऱ्यांना मदत करताना हात आखडता घेऊ नका, असे आमदार बाबर यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले. बैठकीत प्रामुख्याने पिण्याचे पाणी, चारा टंचाई, वीज समस्या व जलसंधारणाच्या कामांवर सविस्तर चर्चा झाली. यावेळी तालुका कृषी अधिकारी धनराज राठोड यांनी, तालुक्यात १९ हजार ८७१ शेतकरी बाधित असून सुमारे २० हजार हेक्टर क्षेत्राला फटका बसल्याची माहिती दिली. यात १२ हजार ६६९ हेक्टर जिरायती व सुमारे ६ हजार हेक्टर बागायती क्षेत्राचा समावेश आहे. मात्र, आले आणि ऊस पिकांचे पंचनामे झालेले नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी मांडली. २०२६-२७ ची पीकपाणी नोंद अद्याप लागलेली नसल्याची अडचण समोर आल्यावर, शंभर टक्के पंचनामे पूर्ण करा. वाझर येथेही वीज कनेक्शनअभावी पाणीपुरवठा थांबला असून हिवरेत चार दिवसांतून एकदा पाणीपुरवठा होत आहे. जानेवारीपर्यंत २३ गावांत आणि एप्रिल ते जूनदरम्यान १७ गावांत तीव्र पाणीटंचाई जाणवण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

यावर आमदार बाबर यांनी टंचाईग्रस्त गावांच्या अधिग्रहणाचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याचे आदेश दिले. तसेच घोटी बुद्रुक येथे तलावातून जुन्या पाण्याच्या टाकीपर्यंत पाईपलाईनचा प्रस्ताव तयार करण्यास सांगितले. आगामी १५ नोव्हेंबरपासून टेंभूचे आवर्तन सुरू होणार असून, आवर्तन सुरू झाल्यानंतर शेवटच्या टोकावरील गावांना प्राधान्य द्यावे आणि येरळा नदीवरील बंधाऱ्यांवर फळ्या वाढवाव्यात, अशा सूचना दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT