Vedant bandgar murder case 
सांगली

Vedant Bandgar murder case: हमालांचे कामबंद आंदोलन, कामकाज ठप्प

जिल्हाधिकारी, पोलिस प्रमुखांच्या अश्वासनानंतर बंद स्थगित

पुढारी वृत्तसेवा

सांगली : वेदांत बंडगर या बालकाच्या खूनप्रकरणातील आरोपीसह सूत्रधारावरही गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी, यामागणीसाठी सांगली जिल्हा हमाल पंचायतच्या नेतृत्वाखाली सोमवारी सर्व क्षेत्रातील हमाल, तोलाईदार, महिला माथाडी कामगार, गाडीवान यांनी काम बंद आंदोलन केले. सोमवारपासून बेमुदत बंद पुकारण्यात आले होते. मात्र जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा पोलिस प्रमुख तुषार दोशी यांनी याप्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर बंद स्थगित करण्यात आला.

मार्केटयार्डमध्ये निषेध फेरी काढण्यात आली. त्यानंतर बैलगाडी अड्डा येथे ठिय्या आंदोलनास प्रारंभ करण्यात आला. या कामबंद आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळचे सरचिटणीस आप्पा खताळ (धुळे), राज्य संघटक व पुणे हमाल पंचायतचे अध्यक्ष गोरख मेंगडे, उपाध्यक्ष दत्ता डोंबाळे, खजिनदार चंद्रकांत मानकर, महामंडळाचे खजिनदार हुसेन पठाण (सर्व पुणे) भाजपा नेते पृथ्वीराज पवार आदी सहभागी झाले होते. यावेळी जिल्हा उपनिबंधक सुनील चव्हाण, बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण, चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अमरसिंह देसाई, संचालक विकास मगदूम आणि हमाल पंचायतचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी आठ दिवसांत प्रशासनाने योग्य ती कारवाई केली नाही, तर पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी बाळासाहेब बडंगर, मारुती बंडगर, हमाल पंचायतचे उपाध्यक्ष राघु बंडगर, प्रल्हाद व्हनमाने, खंडु सोन्नुर, श्रीमंत बंडगर, भारत गायकवाड, दिंगबर तुपलोडें, बजरंग खुटाळे, तोलाईदार सभेचे उपाध्यक्ष बजरंग मोहिते यांच्यासह हमाल, तोलाईदार, महिला माथाडी कामगार, गाडीवान आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT