Vasantdada Bank 
सांगली

Vasantdada Bank case: महापालिकेच्या १०० कोटींच्या ठेवी अडकल्या

सहकार मंत्र्यांकडून चौकशी; वसुलीचे आदेश रद्द केल्याचा फटका

पुढारी वृत्तसेवा
ॲड. शिवाजी कांबळे

सांगली : सुमारे २२ वर्षांपूर्वी सांगली महापालिकेने वसंतदादा शेतकरी सहकारी बँकेत ३२ कोटींच्या ठेवी ठेवल्या आहेत. व्याजासह त्या ठेवी आता १०० कोटीहून अधिक झाल्या आहेत. सहकारमंत्र्यांनी चौकशी व वसुलीचे आदेश रद्द केल्याने या ठेवी परत मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे सहकारमंत्र्यांच्या विरोधात महापालिकेने त्यांच्या ठेवींसाठी न्यायालयात दाद मागण्याची नागरिकांतून मागणी होत आहे.

सांगलीतील सर्वसामान्य नागरिक घरपट्टी, पाणीपट्टी व अन्य माध्यमातून महापालिकेला कर भरत असतात. अशा नागरिकांनी महापालिकेला भरलेल्या कराची रक्कम तत्कालीन कारभाऱ्यांनी वसंतदादा सहकारी बँकेत ठेव स्वरूपात ठेवली होती. कायद्यानुसार ही रक्कम राष्ट्रीयीकृत बँकेत न ठेवता या सहकारी बँकेत ठेवल्याने तत्कालीन नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी सर्वसामान्य सांगलीकरांचा विश्वासघात व फसवणूक केली आहे. दुसरीकडे बँकेने मुदतीत ठेव दिलेली नाही.

ॲड. रैनाक यांनी चौकशी करून तत्कालीन २८ संचालक व २ अधिकारी यांच्याकडून १९५ कोटी रुपये वसूल करण्याबाबतचा अहवाल सादर केला आहे. त्या अहवालानुसार ती रक्कम संबंधितांकडून वसूल करण्याचे आदेश सहकार आयुक्त यांनी अवसायकांना तीन वर्षांपूर्वी दिले आहेत. आता सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी चौकशी अहवालच रद्द केला आहे. त्यामुळे १९५ कोटी वसूल होणार नाहीत. या पार्श्वभूमीवर सांगली, मिरज, कुपवाड शहर महापालिकेच्‍या शंभर कोटींच्या ठेवी वसूल होण्याची शक्यता नाही. म्हणून महापालिकेने सहकारमंत्र्यांच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दावा करून तो आदेश रद्द करून संबंधित दोषी संचालकांकडून ती रक्कम वसूल करावी, अशी सर्वसामान्य सांगलीकरांची मागणी आहे. राजकीय सोयीसाठी मंत्र्यांनी दिलेल्‍या निर्णयामुळे महापालिकेला शंभर कोटीहून अधिक रुपयांचे आर्थिक नुकसान होणार आहे.

दोषमुक्त झालेले संचालक व त्यांच्या नावावरील रकमा...

बँकेचे तत्कालीन अध्यक्ष मदन पाटील : (८ कोटी ३० लाख ७ हजार ३४१ रुपये). त्यांचे निधन झाल्याने त्यांचे वारसदार असलेले पत्नी श्रीमती जयश्री मदन पाटील- २ कोटी ७६ लाख ६९ हजार १३१ रुपये, मुलगी सौ. सोनिया सत्यजित होळकर- २ कोटी ७६ लाख ६९ हजार ११४ रुपये, मुलगी मोनिका मदन पाटील- २ कोटी ७६ लाख ६९ हजार ९६ रुपये यांना जबाबदार धरण्यात आले होते. याशिवाय अन्य संचालक शशिकांत कलगोंडा पाटील- ७ कोटी ७१ लाख ३ हजार ६४७ रुपये, नरसगोंडा सातगोंडा पाटील- १० कोटी २ लाख ७६ हजार १३६ रुपये, सुरेश आदगोंडा पाटील- ९ कोटी २९ लाख ४८ हजार ५७६ रुपये, अमरनाथ सदाशिव पाटील- १० कोटी २ लाख २४ हजार ६९२ रुपये, किरण राजाभाऊ जगदाळे- ९ कोटी ८२ लाख २४ हजार ८६४ रुपये, माधवराव ज्ञानदेव पाटील- ७ कोटी ५६ लाख ६२ हजार ८७१ रुपये, तुकाराम रामचंद्र पाटील- ७ कोटी २८ लाख ७० हजार २८८ रुपये.

सुरेश देवाप्पा आवटी- ७ कोटी ५६ लाख ६३ हजार ३७१ रुपये, सौ. कुंदन बापूसोा पाटील- ३ कोटी ९३ लाख ६१ हजार ३७३ रुपये, सौ. प्रमिलादेवी प्रकाशराव माने- ७ कोटी ५६ लाख ६३ हजार ३६७ रुपये, सुभाष गणपती कांबळे- ७ कोटी ५६ लाख ६३ हजार ३६३ रुपये, दादासोा वाघू कांबळे- ७ कोटी ५६ लाख ६३ हजार ३६१ रुपये, तर निवृत्तीराव मारुती पाटील यांच्यावर ७ कोटी ७५ हजार ९०६ रुपयांना जबाबदार धरले होते, या रकमेस रणजित निवृत्ती पाटील व माधुरी निवृत्ती पाटील यांच्‍यावर अनुक्रमे ३ कोटी ५० लाख ३७ हजार ९५९ आणि ३ कोटी ५० लाख ३७ हजार ९४७ रुपये अशी जबाबदारी बसवण्यात आली होती.

सतीश आप्पासाहेब बिरनाळे यांचे वारसदार म्हणून श्रीमती प्रेमा सतीश बिरनाळे - २ कोटी ३० लाख ८९ हजार २६ रुपये, स्मिता सतीश बिरनाळे - २ कोटी ३० लाख ८९ हजार २१ रुपये, गीता सतीश बिरनाळे - २ कोटी ३० लाख ८९ हजार रुपये, नीता सतीश बिरनाळे - २ कोटी ३० लाख ८८ हजार ९८८ रुपये, जंबुराव दादा थोटे यांचे वारसदार म्हणून राहुल जंबुराव थोटे - १ कोटी ८९ लाख २१ हजार ५३५ रुपये, शीतल जंबुराव थोटे - १ कोटी ८९ लाख २१ हजार ५३१ रुपये, श्रीमती विमल जंबुराव थोटे - १ कोटी ८९ लाख २१ हजार ५१७ रुपये, सौ. वैशाली राजवर्धन भूमकर - १ कोटी ८९ लाख २१ हजार ५०८ रुपये, भरत महादेव पाटील यांचे वारसदार म्हणून श्रीमती शैलजा भरत पाटील - ३ कोटी ३४ लाख २७ हजार ४३५ रुपये, उदय भरत पाटील - ३ कोटी ३४ लाख २५ हजार ३९३ रुपये,

विजय विरुपाक्ष घेवारे यांचे वारसदार म्हणून श्रीमती शैलजा विजय घेवारे - ५ कोटी १ लाख ३८ हजार ११९ रुपये, वीरेंद्र विजय घेवारे - ५ कोटी १ लाख ३८ हजार ९९ रुपये, मुजीर आब्बास जांभळीकर - २ कोटी ४६ लाख १३ हजार ९७३ रुपये, सौ. बेबीताई मारुती पाटील - १ कोटी ६२ लाख ७५ हजार २१ रुपये, सौ. वंदना संभाजी पाटील - १ कोटी ७५ लाख ५० हजार ८६० रुपये, निवास दत्ताजीराव देशमुख - २ कोटी ४६ लाख १३ हजार ९७८ रुपये, दत्तात्रय श्रीपती सूर्यवंशी- २ कोटी ४६ लाख १३ हजार ९७८ रुपये, सुधाकर धोंडिराम आरते यांचे वारसदार म्हणून उमेश सुधाकर आरते - ६९ लाख १९ हजार ७४५ रुपये, ओंकार सुधाकर आरते - ६९ लाख १९ हजार ७३८ रुपये, गजानन लक्ष्मण गवळी - २ कोटी ४६ लाख १३ हजार ९७४ रुपये, सर्जेराव सखाराम पाटील - २ कोटी ४६ लाख १३ हजार ९७८ रुपये, सुरेश जिनगोंडा पाटील - २ कोटी ४६ लाख १३ हजार ९८० रुपये, अरविंद शामराव पाटील - २ कोटी ४६ लाख १३ हजार ९८३ रुपये, श्रीपाल नेमगोंडा बिरनाळे - २ कोटी ४६ लाख १३ हजार ९७९ रुपये, आनंदराव मारुती पाटील- २ कोटी ४६ लाख १३ हजार ९८१ रुपये,

याशिवाय तत्कालीन मुख्य कार्यकारी संचालक भूपाल दत्तात्रय चव्हाण यांचे वारसदार म्हणून मिलिंद भूपाल चव्हाण- ५ कोटी ५४ लाख ३९ हजार ६७८ रुपये, विवेक भूपाल चव्हाण- ५ कोटी ५४ लाख ३९ हजार ६५५ रुपये, प्रकाश बाबुराव साठे - ८ कोटी ९० लाख ९९ हजार ७५५ रुपये, असे ३२ जणांचे एकूण १९५ कोटी १ लाख ७४ हजार रुपये.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT