Rape case: ‘वंचित’च्या जिल्हाध्यक्षाला बलात्कारप्रकरणी अटक File Photo
सांगली

Rape case: ‘वंचित’च्या जिल्हाध्यक्षाला बलात्कारप्रकरणी अटक

कवठेमहांकाळ येथील घटना; संशयितासह चौघांवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ तालुक्यातील एका पीडितेवर वारंवार बलात्कारप्रकरणी वंचित बहुजन आघाडीचा सांगली जिल्हाध्यक्ष शंकर मार्तंड माने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्याला अटक झाली आहे, 30 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.

माने याच्यापासून तिला एक अपत्य आहे. माने याच्याविरोधात बलात्काराचा, तसेच त्याचे नातेवाईक शोभा मार्तंड माने, सिद्धू मार्तंड माने आणि सविता शंकर माने यांच्याविरुद्ध मानसिक त्रास दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, 2007 पासून ते 2025 पर्यंत संशयित शंकर माने याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवले. यातून त्याने कवठेमहांकाळ तालुक्यातील झुरेवाडी आणि कुपवाड एमआयडीसी परिसरात पीडितेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यातून पीडितेने एका मुलास जन्म दिला. मुलाच्या जन्मानंतर त्याची कागदपत्रे बनवण्यासाठी पीडिता कवठेमहांकाळ येथे गेली असता शंकर माने याच्यासह त्याच्या नातेवाईकांनी पीडितेला शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण केली. यामुळे मानसिक तणावाखाली असणार्‍या पीडितेने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या. हा प्रकार समोर आल्यानंतर वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून अपत्यास जन्म देण्यास कारणीभूत ठरल्याने शंकर माने याच्याविरोधात बलात्काराचा, तर त्याच्या नातेवाईकांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात नोंद झाली असून उपनिरीक्षक रवींद्र भापकर तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT