सांगली

सांगली जिल्ह्यात अवकाळीने नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करा : वैभव पाटील

backup backup

विटा; पुढारी वृत्तसेवा : सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी केली आहे.

गेल्या चार दिवसात सांगली जिल्ह्यातील ग्रामीण भागात विशेषतः खानापूर,आटपाडी, तासगाव, मिरज पूर्व, जत या पट्ट्यात अवकाळी पावसाने थैमान घातले. त्यामुळे शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यावर्षी सरा सरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने अगोदरच अडचणीत असलेला बळीराजाला अधिकच आर्थिक अडचणीत सापडला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे जिल्हा ध्यक्ष वैभव पाटील म्हणाले की, गेल्या आठवडा भरात सांगली जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. यामुळे हंगामी पिकांचे नुकसान तर झाले आहेच. शिवाय द्राक्ष बाग, ऊस यासारख्या नगदी पिकांचेही मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. अगोदरच खरिप हंगाम वाया गेल्यामुळे शेतकरी अर्थिक अडचणीत आहे. अशावेळी शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका शासनाने घेतली पाहिजे. त्यासाठी शेती नुकसानीचे पंचनामे होण्याची गरज आहे,तसेच जिल्ह्यात ज्या ठिकाणी नुकसान झाले आहे. तेथील शेती पिकांचे त्वरित पंचनामे करावेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या धोरणानुसार योग्य ती कार्यवाही करून मोबदला द्यावा, अशी मागणी आपण उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी केली असल्याचे जिल्हाध्यक्ष पाटील यांनी म्हटले आहे.

SCROLL FOR NEXT