कुरळप : येथे डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील यांनी मार्गदर्शन केले. 
सांगली

Dr. Smita Jadhav| डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचारासाठी वाळवा तालुक्यात गावोगावी एकजूट : अशोक पाटील

कुरळप येथे मेळावा

पुढारी वृत्तसेवा

कुरळप : पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचारासाठी भाजप कार्यकर्त्यांनी एकजुटीने मैदानात उतरावे, पदवीधर मतदारांशी थेट संपर्क साधावा आणि पक्षाची भूमिका प्रभावीपणे त्यांच्यापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक पाटील यांनी केले. कुरळप (ता. वाळवा) येथे बुधवार, दि. २१ रोजी पाटील यांच्या कार्यालयात डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचारार्थ आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते.

पाटील म्हणाले, पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक ही कार्यकर्त्यांच्या संघटनशक्तीची आणि जनसंपर्काची कसोटी आहे. निवडणुकीच्या काळात केवळ बैठका घेऊन चालणार नाही, तर प्रत्येक कार्यकर्त्याने प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. पदवीधर मतदारांशी संवाद साधून त्यांच्यापर्यंत उमेदवाराची भूमिका पोहोचविण्यासाठी सर्वांनी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे.

कार्यकर्त्यांची एकजूट महत्त्वाची ठरणार असल्याने सर्वांनी कामाला लागावे, असे विचार वारणा दूध संघाचे माजी संचालक व्ही. टी. पाटील आणि तंटामुक्त गाव समितीचे माजी अध्यक्ष मारुती जाधव यांनी व्यक्त केले. यावेळी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये समन्वय ठेवून प्रचाराची दिशा ठरविण्याबाबत चर्चा झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT