बांदा : सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रविवारी पहाटे विनापरवाना दारू वाहतुकीवर बांदा येथे मोठी कारवाई केली. या कारवाईत 2 लाख 11 हजाराच्या गोवा दारूसह 10 लाखाची कारू मिळून 12 लाख 11 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सांगली येथील दोघांना अटक करण्यात आली.
ही कारवाई बांदा येथील हॉटेल कावेरी लगत रविवारी पहाटे 3.30 वा. च्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी आकाश नामदेव खोत (25, रा. सलगरे, जि. सांगली) आणि विठ्ठल पांडुरंग नाईक (48, रा. विश्रामबाग, जि. सांगली) या दोघांना अटक केली आहे. हे दोघेही त्यांच्या कार मधून गोवा ते सांगली अशी गोवा दारूची विनापरवाना वाहतूक करत होते. पोलिसांनी त्यांच्या गाडीची तपासणी केली असता, गाडीत गोवा दारूच्या विविध ब्रॅण्डच्या दारू बॉटलचे बॉक्स सापडून आले.