जत : जत पोलिस ठाण्याकडील दोघा सराईत गुन्हेगारांना सहा महिन्याकरिता हद्दपार करण्यात आले आहे. रोहित गुलाब सोनुरे (वय 26, रा. अचकनहळ्ळी) व विकास अशोक बनपट्टी (वय 27, रा. विठ्ठलनगर) अशी त्यांची नावे आहेत. सोनुरे याच्यावर 12 गंभीर व 2 अदखलपात्र, असे 14 गुन्हे, तसेच बनपट्टी याच्यावर सहा गंभीर व चार अदखलपात्र, असे 10 गुन्हे दाखल आहेत.
उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर यांनी ही कारवाई केली.सोनुरे व बनपट्टी या दोघांना सांगली जिल्हा व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, मंगळवेढा, तालुक्यातून सहा महिन्याकरिता हद्दपार करण्यात आले आहे.
जत पोलिस ठाण्याच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार रोहित सोनुरे, विकास बनपट्टी या दोघांना सांगली व सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, मंगळवेढा, पंढरपूर तालुक्यातून सहा महिन्याकरीता हद्दपार केले आहे. हद्दपार व्यक्ती प्रतिबंध केलेल्या हद्दीत दिसल्यास जत पोलिसांशी संपर्क साधावा. जेणेकरून त्यांच्यावर कारवाई करता येईल, तसेच माहिती सांगणार्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवले जाईल.- संदीप कोळेकर, पोलिस निरीक्षक, जत.