ट्रक-दुचाकी अपघातात युवक ठार झाला. 
सांगली

सांगली : ट्रक-दुचाकी अपघातात युवक ठार

रेठरे धरणजवळील घटना

पुढारी वृत्तसेवा

इस्लामपूर : पेठ- शिराळा रस्त्यावर रेठरेधरण (ता. वाळवा) नजीक दुचाकी-ट्रकची सामोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. सोमनाथ शिवाजी दाभाडे (वय 29 , रा. तडवळे, ता. शिराळा) असे मृत युवकाचे नाव आहे. हा अपघात बुधवारी सायंकाळी घडला. याप्रकरणी ट्रक चालक कृष्णा नारायण इंगळे रा. नारायणवाडी, जि. बीड याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इस्लामपूर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत या अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सोमनाथ हा पुणे येथील खासगी कंपनीत कामाला होता. तो न्यायालयातील कामकाजासाठी तडवळे येथे आला होता. बुधवारी सायंकाळी सोमनाथ हा दुचाकीवरून पुणे येथे जाण्यासाठी निघाला. सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास रेठरेधरणनजीक पेठच्या दिशेने आलेल्या ट्रकने (एमएच 10 डीडी 7795) दुचाकीला जोराची धडक दिली. या धडकेत सोमनाथ याच्या डोक्याला, पायाला गंभीर मार लागला. सोमनाथ याच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. सोमनाथ याच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई, भाऊ ,भावजय असा परिवार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT