वारणावती : सुटीचा दिवस आणि मान्सूनच्या निसर्गसौंदर्याची अनोखी मेजवानी अनुभवण्यासाठी रविवारी मेणीखोरा–गुढे पाचगणी परिसरात पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. सकाळपासूनच हजारो पर्यटकांनी धबधबे, हिरव्यागार दऱ्या, धुक्याने वेढलेले डोंगर आणि ग्रामीण निसर्गाचा मनमुराद आनंद घेत परिसर अक्षरशः फुलून गेला.
पर्यटकांच्या वाढत्या प्रतिसादाचा सकारात्मक परिणाम स्थानिक अर्थव्यवस्थेवरही होत आहे. हॉटेल व्यवसाय, ग्रामीण खाद्यसंस्कृती, वाहन सेवा, स्थानिक मार्गदर्शक, शेतकरी तसेच लघुउद्योजकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होत असून पर्यटन हा ग्रामीण विकासाचा प्रभावी आधार ठरत आहे. या परिसरात भविष्यात अधिक मूलभूत सुविधा निर्माण करून पर्यटनाला आणखी चालना देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सांगली जिल्हाध्यक्ष तानाजी सावंत यांनी दिली.