Leopard Cubs  File Photo
सांगली

Leopard cubs death: बिबट्याचे तीन बछडे होरपळून मृत्युमुखी

फाळकेवाडीतील घटना : शॉर्टसर्किटने उसाच्या फडाला आग

पुढारी वृत्तसेवा

बागणी : फाळकेवाडी (ता. वाळवा) येथे शॉर्टसर्किटमुळे उसाच्या फडाला आग लागून फडातील बिबट्याचे तीन बछडे होरपळून मृत्युमुखी पडले. ही घटना मंगळवार, दि. 17 रोजी घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, फाळकेवाडी येथील नागाव रस्त्यावर अनिल तेरदाळे यांच्या शेतात उसाचे पीक आहे. या फडात मादी बिबट्याने आपल्या तीन बछड्यांना आश्रयाला ठेवले होते. मंगळवारी शेतावरुन गेलेल्या विद्युततारांंमध्ये शॉर्टसर्किट होऊन अचानक उसाच्या फडाला आग लागली. क्षणार्धात आगीने रौद्र रुप धारण केलेे. उसाच्या फडात आगीने वेढले गेल्याने या बछड्यांना जीव वाचविण्याची संधीच मिळाली नाही. आगीची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

यावेळी आगीमध्ये बिबट्याचे तीन बछडे होरपळल्याचे दिसून आले. यातील दोन बछड्यांचा फडातच होरपळून मृत्यू झाला, तर तिसऱ्या बछड्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, आपल्या बछड्यांचा मृत्यू झालेला मादी बिबट्या बिथरुन भागात डरकाळी फोडत फिरत आहे. कदाचित हा मादी बिबट्या हिंसक होण्याची भीती निर्माण झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT