Flood Situtation in Sangli
सांगलीत कृष्णेची पातळी 33 फुटांवर  Pudhari Photo
सांगली

सांगलीत कृष्णेची पातळी 33 फुटांवर

पुढारी वृत्तसेवा

सांगली : स्वप्निल पाटील

सांगली जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सध्या सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 33 फुटांवर पोहोचली आहे. कोयना धरणातून दहा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे पाणीपातळीत आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. याबरोबरच चांदोली धरणातून देखील 10 हजार 460 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वारणा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे.

शिराळा तालुक्यातील वारणा नदीवरील तीन मोठ्या पूलांसह सर्व छोटे पूल पाण्याखाली गेल्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्याशी संपर्क तुटला आहे. सांगलीतील अमरधाम स्मशानभूमीत कृष्णा नदीचे पाणी शिरल्यामुळे या ठिकाणी अंत्यविधी बंद करून कुपवाड मध्ये अंत्यविधी करण्यात येत आहेत. सांगलीत आतापर्यंत पूर बाधित क्षेत्रातील 14 कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात आले आहे. तसेच कोयना धरणातून आणि चांदोली धरणातून सोडण्यात आलेल्या विसर्गामुळे कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत आणखीन वाढ होणार आहे.

SCROLL FOR NEXT