मिरज : मिरज ते पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर टेम्पो जळून खाक झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही. अग्निशमन दलाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.
हा टेम्पो चिरमुऱ्याची पोती पोहोच करण्यासाठी इचलकरंजी येथे गेला होता. पोती उतरवून टेम्पो पंढरपूरकडे परतत असताना या टेम्पोला अचानक आग लागली. आगीची घटना निदर्शनास येतात चालकाने टेम्पोमधून उडी मारली. त्यामुळे जीवित हानी टळली. आगीबाबत माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर आग आटोक्यात आणण्यात आली.