तासगावच्या तत्कालीन वाहतूक निरीक्षक मीना पाटील बडतर्फ 
सांगली

Sangli News : तासगावच्या तत्कालीन वाहतूक निरीक्षक मीना पाटील बडतर्फ

कामातील अनियमितता, बोगस कागदपत्रे भोवली

पुढारी वृत्तसेवा

तासगाव : एसटी महामंडळाच्या तासगाव आगारातील तत्कालीन आणि सध्या आटपाडी आगारात कार्यरत असलेल्या वाहतूक निरीक्षक मीना पाटील यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. बोगस कागदपत्रे सादर करून नोकरी मिळवणे, कामातील अनियमितता आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत सांगली विभाग प्रमुख सुनील भोकरे यांनी ही कठोर कारवाई केली आहे.

मूळच्या तासगाव येथील असलेल्या मीना पाटील यांनी एसटी महामंडळात नोकरी मिळवताना अनेक बनावट कागदपत्रे सादर केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. विशेषतःपदासाठी आवश्यक शारीरिक उंची नसतानाही त्यांनी चुकीची माहिती देऊन निकष पूर्ण केल्याचे भासविले. आवश्यक शैक्षणिक अर्हता नसतानाही त्यांनी खोटी कागदपत्रे जोडली होती.

अनुभवाबाबत त्यांनी माधवनगर येथील एका रोडलाईन्समध्ये काम केल्याचे प्रमाणपत्र सादर केले होते. मात्र, चौकशीत त्या तासगाव येथील एका सेतू कार्यालयात काम करत असल्याचे समोर आले. त्यांनी सादर केलेले अनुभवाचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

मीना पाटील यांच्याविरोधात तक्रार प्राप्त झाल्यानंतर विभागीय पातळीवर सखोल चौकशी करण्यात आली. यामध्ये त्यांच्या कामकाजातील गंभीर त्रुटी समोर आल्या. रजा न घेता कर्तव्यावर गैरहजर राहणे, कार्यालयीन वेळेत गणवेशावर रिल्स बनवून सोशल मीडियावर टाकणे, अशा कारणांनी त्या वादात सापडल्या होत्या. यापूर्वी रिल्स प्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले होते, मात्र त्यांच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नाही. एका घटनेत त्यांनी प्रवासात असलेल्या विद्यार्थ्यांचे बस पास काढून घेतल्याने मोठा गदारोळ झाला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT