तासगाव तालुक्‍याला पावसाने झोडपले  File Photo
सांगली

तासगाव तालुक्‍याला पावसाने झोडपले

पुढारी वृत्तसेवा

तासगाव : पुढारी वृत्तसेवा

शनिवारी रात्रीनंतर आज (रविवार) सकाळपर्यंत तासगाव तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. सावळज आणि वायफळे मंडलात अतिवृष्टी झाली. मांजर्डे मंडलातही ६३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात २४ तासात तब्बल ५२.६ मिलीमीटर पाऊस पडलेला आहे.

या पावसामुळे ओढे - नाले भरुन वाहते झाले असून, अग्रणी नदीला पूर आला आहे. अनेक गावांच्या हद्दीतील अग्रणी नदी पात्रातील पुलावरून पाणी वाहू लागले होते. या भागातील द्राक्षबागा पावसाच्या पाण्याने तुडूंब भरलेल्या आहेत.

मुसळधार पावसामुळे मध्यरात्रीनंतर अग्रणी नदीला पूर आला. पहाटेच्या वेळी सावळज, गव्हाण आणि मळणगाव हद्दीतील अग्रणी पात्रातील पूल पाण्याखाली गेला होता.

शनिवारी रात्रीपासून ते रविवारी पहाटेपर्यंत तालुक्यातील तासगाव, सावळज, मणेराजुरी, येळावी, विसापूर, मांजर्डे आणि वायफळे मंडळातील सर्व गावांना मुसळधार पावसाने झोडपून काढले होते. पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये रस्त्यालगतची झाडे उन्मळून पडली आहेत. विजेच्या तारा तुटल्याने विद्यूत पुरवठा खंडित झाला होता.

२२ सप्टेंबर अखेर तालुक्यातील सरासरी व प्रत्यक्ष पाऊस मिलीमीटरमध्ये

महिना सरासरी पडलेला सरासरी

जून ११४.४ २४३.४ २१२.८

जुलै १०६.४ १९६.७ १८४.९

ऑगस्ट ८६.२ २०१.९ २३४.२

सप्टेंबर ९८.२ ११२.२ ११३.२

एकूण ४०५.२ ७५३.२ १८५.९

शनिवारी तालुक्यात पडलेला मंडलनिहाय पाऊस (मिलीमीटर मध्ये)

मंडल पाऊस (मिमी)

मांजर्डे ६३.३

विसापूर ३४.३

येळावी १८.८

मणेराजुरी ५१.५

सावळज ७७.८

तासगाव ४३.०

वायफळे ७९.६

........................................................

सरासरी ५२.६

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT