तासगावात तरुणीस नगरपालिका कर्मचाऱ्याची मारहाण 
सांगली

Sangli Crime : तासगावात तरुणीस नगरपालिका कर्मचाऱ्याची मारहाण

पोलिसात गुन्हा : पालिका कारवाई करणार का?

पुढारी वृत्तसेवा

तासगाव : येथील नगरपालिकेमध्ये पाणी पुरवठा विभागात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने एका तरुणीस मारहाण केल्याप्रकरणी तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दादू देवकुळे ( रा. साठे नगर, तासगाव) असे त्याचे नाव असून त्याच्यासह एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयेशा सिकंदर पठाण ( वय १९, रा. वरचे गल्ली, तासगाव) यांनी फिर्याद दिली.

याबाबत अधिक माहिती अशी की, दादू देवकुळे हा तासगाव नगरपालिका पाणी पुरवठा विभागात गेली अनेक वर्षे कंत्राटी पद्धतीने काम करतो. शनिवारी वरचे गल्ली येथील आठवडा बाजार भरतो. रात्री साडे आठच्या सुमारास आयेशा पठाण या भाजीपाला घेऊन घरी जात होत्या. यावेळी संशयित देवकुळे व त्याचा साथीदार वरचे गल्ली येथे रस्त्यावर थांबले होते. त्यांनी पठाण यांना शिवीगाळ केली. यावेळी पठाण यांनी विचारणा केली असता संशयित देवकुळे व त्याच्या साथीदाराने पठाण यांना मारहाण केली. अधिक तपास तासगाव पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT