Crime Pudhari
सांगली

Sangli Crime : तासगावात माजी नगरसेवकाला मारहाण

तिघांवर गुन्हा दाखल : रुग्णालयात मोडतोड

पुढारी वृत्तसेवा

तासगाव : तासगाव येथील माजी नगरसेवक शरद राजेंद्र मानकर (वय 38, रा. पागा गल्ली) यांच्यावर तिघांनी जीवघेणा हल्ला करून मारहाण केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. या हल्ल्यात मानकर गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी तिघांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गणेश जाधव (रा. तासगाव), समीर जमादार (रा. बापूवाडी, तासगाव) आणि सुशांत धनवडे (रा. सिद्धेश्वर कॉलनी, तासगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

शरद मानकर हे माजी नगरसेवक आहेत. ते माजी खासदार संजय पाटील यांचे समर्थक आहेत. शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मानकर सांगली नाका परिसरात येत असताना समोरून चुकीच्या दिशेने आलेल्या एका अज्ञात युवकाच्या वाहनाने त्यांना धडक दिली. मानकर यांनी संबंधित युवकाला पागा गल्लीतील खासगी रुग्णालयात दाखल केले. या अपघातात मानकर स्वतःही जखमी झाल्याने त्यांच्यावरही तेथेच उपचार सुरू होते. फिर्यादी मानकर आणि अज्ञात जखमी याच्यावर रुग्णालयात असतानाच संशयित गणेश जाधव, समीर जमादार आणि सुशांत धनवडे हे तिघे आले. तू आम्हाला शिवीगाळ का केलीस? असा सवाल करत वाद घातला.

माफी मागूनही संशयित गणेश जाधव याने लोखंडी रॉडने मानकर याना पायावर गुडघ्यावर मारून जखमी केले. संशयित समीर जाधव याने टॉमीने मानकर याच्या पायावर व हातावर तर संशयित सुशांत धनवडे याने मानकर याना मारहाण केली . हल्ल्यादरम्यान संशयितांनी रुग्णालयात दोन बेडची तोडफोड केली असल्याची माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच मानकर यांचे समर्थक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले, तर हल्लेखोरांच्या समर्थकांनीही तेथे गर्दी केली. यावेळी दोन्ही गटांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. पोलिसांनी धाव घेत जमाव पांगवला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT