मुस्लिम समाज पोलिस अधीक्षकांना निवेदन देताना Pudhari Photo
सांगली

रामगिरी महाराजांवर कारवाई करा

पुढारी वृत्तसेवा

सांगली : पुढारी वृत्तसेवा

रामगिरी महाराज यांनी मुस्लिमांच्या धार्मिक भावना दुखावल्यामुळे त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समस्त मुस्लिम संघटनेच्यावतीने करण्यात आली. पोलिस अधीक्षक संदीप घुगे आणि शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजय मोरे यांना निवेदन देण्यात आले.

सध्या सोशल मीडियावर रामगिरी महाराज यांची एक व्हिडिओ क्लिप प्रसारित झाली आहे. यामधील वक्तव्यातून त्यांनी मुस्लिम लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. ही व्हिडिओ क्लिप प्रसारित करण्यामागे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा त्यांचा हेतू आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष असीफ बावा, उमर गवंडी, मुनीर मुल्ला, सलीम पन्हाळकर, इम्रान जमादार, सोहेल इनामदार, अकबर शेख, सद्दाम खाटीक, शहनवाज फकीर आदी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT