कुरुंदवाड; पुढारी वृत्तसेवा : सांगली येथील संतोष कदम हत्याप्रकरणी फरारी तिसरा आरोपी तुषार महेश भिसे (वय२०, रा. आकाशवाणी केंद्राजवळ सांगली) पोलिसांनी गुरुवारी रात्री २ संशयित आरोपी अटक केली होती. संशयित आरोपी तुषार भिसे हा फरार होता. पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे सपोनि रविराज फडणीस, यांनी सापळा रचून शुक्रवारी रात्री सांगली येथून भिसेच्या मुसक्या आवळत त्याला गजाआड केले.
संशयित तिघा आरोपींना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधीकारी यांच्या समोर उभे केले असता १४ तारखेपर्यंत ५ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सांगली येथील बेपत्ता माहिती अधिकार कार्यकर्ता संतोष विष्णू कदम (वय ३६, रा. गावभाग सांगली) याने संशयीत आरोपी नितेश वराळेला नोकरी लावण्यासाठी घेतलेले पैसे परत न दिल्याने संशयित वराळे, जाधव आणि भिसे या तिघांनी धारदार चाकूने कदमवर वर्मी घाव करून हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले.
संशयित आरोपी वराळे आणि जाधव या दोघांना गुरुवारी रात्रीच पोलिसांनी गजाआड केले होते. तिसऱ्या आरोपीसाठी दोन पथके रवाना केली होती. रात्री उशिरा माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून भिसेच्या मुसक्या आवळत त्याला गजाआड केले.
हेही वाचा :