Fraud Case file photo
सांगली

Sangli Fraud case: ऊसतोड मजूर पुरविण्याच्या बहाण्याने दोन लाख रुपयांची फसवणूक

दोन भावांना भिलवडी पोलिसांनी अटक केली

पुढारी वृत्तसेवा

भिलवडी : ऊसतोड मजूर पुरवण्याच्या बहाण्याने 1 लाख 94 हजार रुपये उचलून मजूर न पुरवता फसवणूक केल्याप्रकरणी अमोल महादेव कोळेकर (वय 39) आणि अधिक महादेव कोळेकर (वय 36, रा. खूपसिंगी, ता. मंगळवेढा) या दोन भावांना भिलवडी पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्यांना सोमवार, 13 एप्रिल 2026 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, उमेश पांडुरंग पाटील (रा. भिलवडी, ता. पलूस) यांनी 2024-25 च्या गळीत हंगामासाठी मजूर मिळावेत म्हणून कोळेकर बंधूंना 1 लाख 94 हजार रुपये ॲडव्हान्स म्हणून दिले होते. मात्र, पैसे घेऊनही संशयितांनी मजूर पाठवले नाहीत. वारंवार मागणी करूनही मजूर न मिळाल्याने आणि दिलेली रक्कम परत न केल्याने उमेश पाटील यांचा हंगाम वाया गेला असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी भिलवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांनाही सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. भिलवडी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली किरण हारुगडे अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT