Cheating Case: ऊस मजूर पुरविण्याच्या आमिषाने शेतकर्‍यास आठ लाखांचा गंडा  File Photo
सांगली

Cheating Case: ऊस मजूर पुरविण्याच्या आमिषाने शेतकर्‍यास आठ लाखांचा गंडा

गुजरातमधील दोघा मुकादमांवर गुन्हा; एकास अटक

पुढारी वृत्तसेवा

भिलवडी : ऊसतोड मजूर पुरवण्यासाठी खटाव (ता. पलूस) येथील शेतकर्‍याची आठ लाख 9 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. याबाबत भिलवडी पोलिसांत गुजरातमधील दोघा मुकादमांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी एका मुकादमाला अटक करण्यात आली आहे.

खटाव येथील नितीन राजाराम ढेरे यांना राजूभाई गणपतभाई पवार (रा. रावचोड, ता. अहवा, जि. डांग), मोहनभाई हरजसिंग (रा. लिंगा, ता. अहवा, जि. डांग, गुजरात) या दोघांनी 2023 या गळीत हंगामासाठी ऊसतोड मजूर पुरवविण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी ढेरे यांच्याकडून आठ लाख 9 हजार रुपये बँकेतून व रोख स्वरूपात घेतले. 30 मजूर पुरवतो, असे सांगून ढेरे व त्यांचे मित्र श्रीकृष्ण शिवलिंग पाटील यांनी क्रांती कारखान्याच्या ऊसतोडीसाठी त्यांना पैसे पुरवले. मात्र, राजूभाई पवार व मोहनभाई हरजसिंग यांनी मजूर न पुरवता त्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ केली.

याप्रकरणी ढेरे आणि पाटील यांनी भिलवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी गुजरातमधून मुकादम राजूभाई पवार यांना ताब्यात घेतले. हवालदार अरविंद कोळी व रामचंद्र गायकवाड यांनी ही कारवाई केली. अधिक तपास भिलवडी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिदास पावसे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT