jaggery 
सांगली

Sugar Price Fall: साखरेचा दर उतरला; गूळ, खाद्यतेल तेजीतच

दोन सप्ताह तेजीत असणारा साखरेच्या दरात या सप्ताहात किलोला दहा रुपयांची घसरण

पुढारी वृत्तसेवा

सांगली : दोन सप्ताह तेजीत असणारा साखरेच्या दरात या सप्ताहात किलोला दहा रुपयांची घसरण झाली. साखर आता ७२ ते ७५ रुपयावरुन ६० ते ६५ रुपये किलो झाली आहे. गुळाचा दर मात्र अजून तेजीत म्हणजे ८२ ते ८५ रुपये किलो आहे. खाद्यतेलाचा दर तेजीत म्हणजे १९० ते २०० रुपये किलो आहे. इतर किराणा मालाचे दर मात्र स्थिर आहेत.

गेल्या सप्ताहात साखर, गुळ, खाद्य आणि डाळीच्या दरात वाढ झाली होती. आता साखर वगळता सर्व दर तेजीतच आहेत. साखरेचा दर आता ६० ते ६५ रुपये झाला आहे. खाद्यतेलाचे दर १९० ते २०० रुपये किलो झाले आहेत. गव्हाचा दर ४५ रुपायांवरून ४८ ते ५० रुपये किलो झाला आहे. शाळूचा दर ५ हजार २०० रुपये क्विंटल आहे. किलोचा दर आता ५८ रुपयांवरुन ६० रुपये किलो आहे. साबुदाण्याचा दर ८६ रुपये आहे.

मटकीचा दर २२० रुपये किलो झाला आहे. वरीचे तांदुळ २०० रुपये किलो झाले आहेत. खोबरे ३८० रुपये किलो आहे. गव्हाचा दर ४ हजार १०० ते ५ हजार ५०० रुपयांवर आहे. शेंगदाण्याचा दर १५० रुपये किलो झाला आहे. मैद्याचा दर ४५ रुपये किलो झाला आहे. हरभरा डाळ ८५ रुपये किलो आहे. मूगडाळ १३०, तूरडाळ १४० रुपये किलो आहे. सूर्यफूल तेलाचा दर १९५ ते २०० रुपये, तर शेंगतेलाचा किरकोळ विक्रीचा दर २१० रुपये किलो आहे. हायब्रीड ज्वारी ४० ते ४२, रवा ५०, मसूरडाळ ८० रुपये किलो आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT