Stop at Sangli, Kirloskarwadi to 'Miraj-Bikaner'
‘मिरज-बिकानेर’ला सांगली, किर्लोस्करवाडीमध्ये थांबा  Pudhari File Photo
सांगली

‘मिरज-बिकानेर’ला सांगली, किर्लोस्करवाडीमध्ये थांबा

पुढारी वृत्तसेवा

सांगली : पुढारी वृत्तसेवा

‘मिरज-बिकानेर’ व ‘बिकानेर-मिरज’ या सुरू होणार्‍या दोन नवीन रेल्वे गाड्यांना सांगली व किर्लोस्करवाडी स्टेशनवर थांबा देण्यात आला आहे. त्यासाठी मध्य रेल्वेकडे पाठपुरावा केल्याची माहिती माजी खासदार संजय पाटील यांनी दिली. महाराष्ट्र भाजप रेल्वे अर्थसंकल्पचे अध्यक्ष कैलास लक्ष्मण वर्मा यांनी सांगली व किर्लोस्करवाडी स्टेशनवर थांबा मिळण्यासाठी मुंबईतील मध्य रेल्वेच्या अधिकार्‍यांशी चर्चा करून मंजुरी मिळवण्यासाठी प्रयत्न केले. सांगली व किर्लोस्करवाडीचा थांबा आता मिरज-बिकानेर व बिकानेर-मिरज गाडीसाठी सुरू राहील. गाडी क्रमांक 20476 मिरज-बिकानेर एक्स्प्रेस प्रत्येक मंगळवारी सांगली स्टेशनवरून दुपारी 2.35 ला सुटून दुसर्‍या दिवशी रात्री 8.40 वा. बिकानेरला पोहोचेल. गाडी क्रमांक 20475 बिकानेर-मिरज एक्स्प्रेस बिकानेरहून प्रत्येक सोमवारी सकाळी 7.30 ला रवाना होऊन सांगली स्टेशनवर मंगळवारी दुपारी 12.27 वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 20476 ‘मिरज-बिकानेर’ एक्स्प्रेस प्रत्येक मंगळवारी सांगली स्टेशनवर दुपारी 2.35, किर्लोस्करवाडीला दुपारी 3, पुणे येथे रात्री 7:40, लोणावळा रात्री 8.50, कल्याण (मुंबई) रात्री 10.25, भिवंडी रोड रात्री 11.05, वसई रोड (मुंबई) रात्री 11.55, वापी रात्री 1.18, सूरत रात्री 3.28, वडोदरा सकाळी 5.25, आणंद सकाळी 6 वा., नडीयाद जंक्शन सकाळी 6.19, अहमदाबाद सकाळी 7.35, मेहसाणा सकाळी 9, पालनपूर सकाळी 10.52, आबू रोड सकाळी 11.40, जवाईबंद दुपारी 12.40, फालना दुपारी 12.57, राणी दुपारी 1.12, मारवार दुपारी 2.38, लुणी दुपारी 3.08, जोधपूर दुपारी 3.50, गोटन संध्याकाळी 5, मेत्रा रोड संध्याकाळी 5.35, नागौर रात्री 7.19 व बिकानेर येथे रात्री 8.40 (बुधवार) ला पोहोचेल.

SCROLL FOR NEXT