सांगली

सांगलीत ‘अ‍ॅग्री पंढरी’ प्रदर्शन तयारीस वेग

backup backup

सांगली; पुढारी वृत्तसेवा: दै. 'पुढारी' माध्यम समूह आणि राज्य शासनाचा कृषी विभाग यांच्या विद्यमाने होत असलेल्या 'अ‍ॅग्री पंढरी' कृषी प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. या ठिकाणी जवळपास 200 हून अधिक स्टॉल्स् असून आता मोजकेच स्टॉल्स शिल्लक आहेत. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना कृषीतील नवनवीन तंत्राचा खजिनाच खुला होणार आहे. विविध पिके, भाजीपिके यांचे लाईव्ह डेमो या प्रदर्शनात असणार आहेत.

विजयनगर येथे मध्यवर्ती शासकीय इमारतींच्या पिछाडीस कृषी विभागाच्या खुल्या जागेत हे प्रदर्शन होणार आहे. दि. 15 ते 19 एप्रिलदरम्यान हे प्रदर्शन होत आहे. यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्या पीक प्रात्यक्षिकांसह सहभागी होणार आहेत. प्रदर्शनातून शेती, दूध उत्पादन, पिके, दुभती जनावरे संगोपन – पैदास, दूधउत्पादन वाढ आदींसाठी माहिती मिळणार आहे. ऑर्बिट क्रॉप सायन्सेस हे या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक आहेत.

'दैनिक पुढारी'तर्फे लाईव्ह डेमोसह कृषी प्रदर्शन फेब्रुवारी 2020 मध्ये सांगलीत झाले होेते. त्यावेळी शेतकर्‍यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

या प्रदर्शनात विविध भाजीपाला पिके, देशी-विदेशी भाजीपाला, फळपिके, विविध नावीन्यपूर्ण पिके यासाठी प्रदर्शनाच्या ठिकाणी लागवड करण्यात आली आहे. यानिमित्ताने शेतकर्‍यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने लागवड केलेली 100 हून अधिक भारतीय, विदेशी पिके पाहता येणार आहेत. कीटकनाशके, खते, बियाणे आणि शेती अवजारे यांचे दोनशेपेक्षा अधिक स्टॉल आहेत. मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन, रोपांमधील अंतर, खत व्यवस्थापन, पिकांसाठी पाणी व्यवस्थापन, सेेंद्रिय शेती, शेततळे, अत्याधुनिक अवजारे, ट्रॅक्टर, ब्लोअर, पेरणी यंत्र, रोप लावणी यंत्र आदी विविध प्रकारची माहिती या प्रदर्शनातून मिळणार आहे.

दरम्यान, अधिक माहिती व स्टॉल बुकिंग यासाठी 9850844271, 9766213003 व 8805007148, संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

SCROLL FOR NEXT