हिवतड येथे दिव्यांग वृद्धाला मारहाण file photo
सांगली

Sangli Crime : हिवतड येथे दिव्यांग वृद्धाला मारहाण

तिघांवर गुन्हा; पत्नीसमोरच दिव्यांगत्वावरून हिणवून धमकी दिल्याची फिर्याद

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी : हिवतड (ता. आटपाडी) येथे पत्नीला शिवीगाळ का केली, असा जाब विचारल्याच्या कारणावरून दिव्यांग वृद्धाला मारहाण करून दिव्यांगत्वावरून हिणवल्याची घटना घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत महादेव खंडू मंडले (वय ६०, रा. हिवतड) यांनी फिर्याद दिली आहे. दिलीप बंडा मंडले, रोहित दिलीप मंडले आणि नंदाबाई दिलीप मंडले (सर्व रा. हिवतड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी महादेव मंडले हे आपल्या घरासमोर खाटेवर बसले होते. यावेळी वरील तिघे त्यांच्या घरासमोरून जात असताना, पत्नीला शिवीगाळ का केली होती, असा जाब त्यांनी विचारला. याचा राग आल्याने तिघांनी महादेव मंडले व त्यांची पत्नी शोभा यांना शिवीगाळ करून दमदाटी केली. यावेळी दिलीप मंडले याने महादेव मंडले हे दिव्यांग असल्याची माहिती असूनही त्यांच्या गालावर व तोंडावर हाताने मारहाण केली. तसेच दिव्यांगत्वावरून हिणवत यापुढे आमच्या नादाला लागू नकोस, अन्यथा तुला सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक खरात करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT