मिरज; पुढारी वृत्तसेवा : मिरजेतील बाप-लेकीने एकत्रित पदवी घेतली. शिवाजी विद्यापीठाचा पदवीदान समारंभ सोमवारी पार पडला. यामध्ये प्रा. रवींद्र फडके व त्यांची कन्या रेवती या दोघांना ही पदवी प्रदान करण्यात आली.
मिरजेतील बापूजी साळुंखे महाविद्यालयातून इंग्रजी माध्यमातून राज्यशास्त्रातील बी. ए. ही पदवी रेवती रवींद्र फडके हिला मिळाली. त्याचबरोबर तिचे वडील प्रा. रवींद्र मोरेश्वर फडके यांना साठाव्या वर्षी एल. एल. बी. स्पेशल ही सहावी पदवी मिळाली. त्यांनी यापूर्वी बी ए, बी. पी. एड., एम. एड., एल. एल. बी. जनरल, पी. एच. डी. अशा पाच पदव्या मिळवल्या आहेत.