Crime Pudhari
सांगली

Sangli Crime: शिरढोण येथे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर अत्याचार

कवठेमहांकाळच्या तरुणाविरोधात गुन्हा; बँकेत नोकरीचा बहाणा

पुढारी वृत्तसेवा

कवठेमहांकाळ : एका 21 वर्षीय तरुणीला बँकेच्या कामाच्या बहाण्याने शिरढोण ता. कवठेमहांकाळ येथील हॉटेलमध्ये बोलावून फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून संबंधित आरोपीविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल केला आहे. तेजस अनिल पवार (वय 24 वर्षे, रा. कवठेमहांकाळ, ता. कवठेमहांकाळ, जि. सांगली) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तेजस याने आधी तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर मानसिक दबाव निर्माण केला. त्यानंतर बँकेच्या कामाचा बहाणा करून 15 एप्रिल रोजी सायंकाळी साडेसहा वाजता शिरढोण येथील हॉटेलमध्ये बोलावले होते. तेथे तेजसने तिला शिवीगाळ करत मारहाण केली. तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

प्रकरणाची तक्रार नांदगाव पेठ, जि. अमरावती येथून सीसीटीएनएसद्वारे ऑनलाईन पद्धतीने कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात दि. 21 एप्रिल रोजी प्राप्त झाली आहे. त्यानुसार कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केला जात असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT