शिराळ्यात गॅस सिलिंडरसाठी गर्दी 
सांगली

Sangli News : शिराळ्यात गॅस सिलिंडरसाठी गर्दी

टंचाईच्या भीतीने धावपळ; घाबरून न जाण्याचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

शिराळा शहर : शिराळा शहर व परिसरात गॅस सिलिंडर मिळवण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. शिराळ्यातील गॅस एजन्सीबाहेर गुरुवारी सकाळपासूनच नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या. संभाव्य टंचाईच्या भीतीने अनेकांनी आगाऊ सिलिंडर घेण्यासाठी एजन्सीकडे धाव घेतली. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे एजन्सीसमोर काही काळ गोंधळ निर्माण झाला हाता. कर्मचाऱ्यांनी नागरिकांना समजावून सांगत रांगा व्यवस्थित लावून सिलिंडर वितरण केले.

शिराळ्यात सिलिंडर गोदामाची पाहणी

शिराळा येथे पुरवठा निरीक्षण अधिकारी शारदा रेळे यांनी स्थानिक गॅस एजन्सीच्या गोदामाला भेट देऊन स्थितीचा आढावा घेतला. सध्या कोठेही गॅस सिलिंडरची टंचाई नसल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच सिलिंडरचा साठा, वितरणाची प्रक्रिया, तसेच ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सिलिंडरची नोंद, याची सविस्तर तपासणी करण्यात आली.

गोदामामध्ये पुरेसा सिलिंडर साठा उपलब्ध आहे. वितरणही नियमानुसार सुरू आहे. गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत असून ग्राहकांना नियमानुसार सिलिंडर उपलब्ध होत आहेत. त्यामुळे घाबरून जाऊन एकाचवेळी मोठ्या प्रमाणात सिलिंडर घेण्याची गरज नाही.
- शारदा रेळे, पुरवठा निरीक्षण अधिकारी, शिराळा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT