शिराळ्यात ‘पदवीधर’साठी ६०.२०, तर ‘शिक्षक’ला ९३.१६ टक्के मतदान 
सांगली

Graduate & Teachers Constituency Election | शिराळ्यात ‘पदवीधर’साठी ६०.२०, तर ‘शिक्षक’ला ९३.१६ टक्के मतदान

मतदानादरम्यान तरुणाईमध्ये कमालीचा उत्साह

पुढारी वृत्तसेवा

शिराळा : शिराळा तालुक्यात पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी काल, शुक्रवारी अत्यंत उत्साहात आणि चुरशीने, मात्र शांततेत मतदान पार पडले. तालुक्यात पदवीधर मतदारसंघासाठी ६०.२० टक्के, तर शिक्षक मतदारसंघासाठी तब्बल ९३.१६ टक्के इतके उच्चांकी मतदान नोंदवले गेले. मतदानादरम्यान तरुणाईमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळाला.

तालुक्यात शिराळा, कोकरूड, शिरशी आणि चरण येथील केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये पदवीधरच्या एकूण २,९२४ मतदारांपैकी १,७७३ मतदारांनी, तर शिक्षक मतदारसंघातील ३६६ पैकी ३४१ मतदारांनी आपला हक्क बजावला. यात एकट्या शिराळा केंद्रावर पदवीधरच्या २,१६२ पैकी १,३४७, तर शिक्षक मतदारसंघाच्या २५५ पैकी २३६ मतदारांनी मतदान केले.

सकाळी ८ वाजता मतदानाला मंदगतीने सुरुवात झाली. सकाळी १० वाजेपर्यंत पदवीधरसाठी १७.५० टक्के, तर शिक्षकसाठी २०.२५ टक्के मतदान झाले होते. दुपारी १२ वाजता हा वेग वाढून अनुक्रमे १९.३९ टक्के आणि ३६.७५ टक्के झाला. दुपारी २ वाजेनंतर मतदानाला अधिक वेग आला. त्यावेळी शिक्षक मतदारसंघासाठी ६३.५० टक्के, तर पदवीधरसाठी ३५.६२ टक्के मतदान झाले होते. पोलिस निरीक्षक जंबाजी भोसले यांनी मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. तसेच सम्राट महाडिक, विराज नाईक, रणधीर नाईक, नगराध्यक्ष पृथ्वीसिंग नाईक आणि संचालक विजय पाटील यांनीही मतदान केंद्रांना भेटी दिल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT