Sangli Accident Pudhari
सांगली

Sangli Accident: शिरढोणजवळ अपघातात दाम्पत्याचा जागीच मृत्यू

कारची ट्रॅक्टर-ट्रॉलीला मागून धडक

पुढारी वृत्तसेवा

कवठेमहांकाळ : कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला मागून जोरदार धडक दिल्याने दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. संतोष धोंडिराम गायकवाड (वय 45) आणि वंदना संतोष गायकवाड (38, रा. जयभवानी गल्ली, कसबा बावडा, कोल्हापूर) अशी मृतांची नावे आहेत. रत्नागिरी-नागपूर महामार्गावर शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) गावाजवळ मंगळवारी (दि. 24) सकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला.

गायकवाड दाम्पत्य कारमधून सोलापूरच्या दिशेने प्रवास करत होते. शिरढोणजवळ रस्त्यालगत साईड पट्टीवर उभा असलेला ट्रॅक्टर व ट्रॉलीला त्यांच्या कारने मागून वेगात जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, कारचा समोरील भाग पूर्ण चक्काचूर झाला आणि यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

महामार्ग पोलिस उपनिरीक्षक अनिल सावळे, उपनिरीक्षक अरुण पाटील, पोलिस कर्मचारी महेश पौटे व श्रीकांत थोरात तसेच पोलिसांनी अपघातस्थळी धाव घेतली. अपघातानंतर ट्रॅक्टरचालक फरार झाला. दोन्ही वाहने रस्त्याकडेला हलविण्यात आली. काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT