तासगाव : लिंब (ता. तासगाव) येथे शेळ्या-मेंढ्या चरावयास घेऊन गेलेल्या मेंढपाळाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. विकास तानाजी मदने (वय 36, रा. लिंब) असे मृताचे नाव आहे. गुरुवारी सायंकाळी ही घटना रेवणगंगा मळा परिसरात घडली.
विकास हे शेळ्या-मेंढ्या राखणीचे काम करीत. ते रेवणगंगा मळा परिसरात फांद्या तोडण्यासाठी झाडावर चढले. फांदी झाडाजवळून गेलेल्या विद्युत वाहिनीवर पडली. विजेचा धक्का बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.