शरद लाड यांचा मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश निश्चित  
सांगली

Sangli : शरद लाड यांचा मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश निश्चित

मुंबईत दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

पुढारी वृत्तसेवा

कडेगाव शहर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड भाजपात प्रवेश करणार आहेत. 7 ऑक्टोबररोजी मुंबईत लाड यांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह दिग्गज मंत्री आणि नेत्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. त्यामुळे पलूस-कडेगाव मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला धक्का बसणार आहे.

शरद लाड हे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आहेत. त्यांनी पलूस-कडेगाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाढीस चालना दिली होती. एकंदरित पलूस-कडेगाव मतदारसंघात राष्ट्रवादीचे मूळ रोवण्यात त्यांना यश मिळाले होते. मात्र आता शरद लाड भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई येथे 7 ऑक्टोबररोजी दिग्गज मंत्री आणि नेते मंडळींच्या उपस्थितीत त्यांचा भाजपात पक्षप्रवेश होणार आहे. शरद लाड यांच्या प्रवेशामुळे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढण्यास आणखी मदत होणार आहे. दुसरीकडे पलूस-कडेगाव मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. दरम्यान, शरद लाड यांनी याबाबत अधिकृत कोणतीही माहिती दिली नसली तरी त्यांचा पक्षप्रवेश निश्चित असल्याची माहिती समोर येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT