कुपवाड : कुपवाड एमआयडीसीतील माईंड फ्लो या कारखान्यातून सात लाख रुपये किमतीचे ॲल्युमिनियम पॅटर्न चोरीस गेले. ही घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेची नोंद कुपवाड पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत एमआयडीसी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, कुपवाड एमआयडीसीमधील माईंड फ्लो या कारखान्यात 25 मे ते 22 नोव्हेंबर 2025 या कालावधीत चोरट्यांनी कारखान्याच्या कुंपणाच्या भिंतीवरून आत जाऊन कंपनीतील 7 लाख रुपये किंमतीचे 1250 किलो वजनाचे लहान व मोठे आकाराचे 50 नग ॲल्युमिनियम पॅटर्न चोरुन नेले आहेत. हा प्रकार लक्षात येताच कंपनीचे इन्चार्ज राकेश परशुराम महाजन (रा. बामणोली) यांनी कुपवाड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सुरू आहे.