मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी शाहूपुरीत बैलगाडीतून विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी कासरा हातात धरून सारथ्य करत साताऱ्याच्या विकासाचा कासराच आपल्या हाती असल्याचे जणू दाखवून दिले.  
सांगली

Shivendraraje Bhosale : साताऱ्याच्या विकासासाठी उदयनराजे, मी एकत्रच

शिवेंद्रराजे : कामे मार्गी लागण्यासाठी आमचा पाठपुरावा

पुढारी वृत्तसेवा

सातारा : नगरपालिकेमध्ये दोघांमध्ये कुठेही मतभेद नाहीत. कामे होण्यासाठी मी व उदयनराजे आम्ही दोघेही प्रयत्न करत आहोत. जी कामे सुरू आहेत ती लवकरात लवकर पूर्ण झाली पाहिजेत. त्याचा फायदा शहराला आणि नागरिकांना झाला पाहिजे. साताऱ्याच्या विकासासाठी आम्ही दोघेही एकत्रच आहोत, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिली. सातारा शहरातील विविध विकासकामांची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

पाहणीवरून खा. उदयनराजे व तुमच्यामध्ये समन्वयाचा अभाव आहे का? या प्रश्नावर ते म्हणाले, असे काही नाही. प्रत्येकाला काही ना काही कामे असतात. उपनगराध्यक्ष बनकर यांनाही पाहणीसंदर्भात निरोप दिला होता. नगरपालिकेमध्ये दोघांमध्ये कुठेही मतभेद नाहीत. कामे होण्यासाठी मी असेल उदयनराजे असतील दोघेही प्रयत्न करत आहोत. जी कामे सुरू आहेत ती लवकर पूर्ण झाली पाहिजेत, त्याचा फायदा शहराला आणि नागरिकांना झाला पाहिजे.

शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात दौरे सुरू केले आहेत, त्याचा महायुतीवर परिणाम होणार का? या प्रश्नावर शिवेंद्रराजे म्हणाले, महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही महायुती सक्षम आहे. तिन्ही पक्ष एकसंघपणे आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सगळेजण काम करत आहेत. यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहिते, अविनाश कदम, धनंजय जांभळे, बाळासाहेब खंदारे, फिरोज पठाण, अक्षय जाधव, राजेंद्र गिरी गोसावी यांच्यासह अन्य नगरसेवक, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT