सांगली : दैनिक पुढारी कस्तुरी क्लब व हिंदवी जनसेवा फाऊंडेशनमार्फत रविवार, दि. 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत सांगलीवाडी येथील दर्शन मंगल हॉल येथे ‘होम मिनिस्टर’ स्पर्धा रंगणार आहेत. हा कार्यक्रम सांगलीवाडीतील सर्व महिलांसाठी खुला राहणार आहे. कस्तुरी सभासदांसाठी फनी गेम्स स्पर्धा आणि बक्षिसांचा खजिना असणार आहे. या कार्यक्रमाचे निवेदन मराठी मालिका ‘देव माणूस’ आणि ‘लाखात एक आमचा दादा’ फेम अभिनेते, युवा व्याख्याते संदीप कुडचीकर करणार आहेत.
संस्थापक अभिजित कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदवी जनसेवा फाऊंडेशन हे गेली सहा वर्षे सातत्याने भागातील नागरिकांसाठी सामाजिक कार्य करत आहे. पूरस्थिती तसेच कोरोना काळात अडचणीत असलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी फाऊंडेशनने नेहमीच पुढाकार घेतला. पैशाअभावी नडलेल्या रुग्णांसाठी व त्यांच्या नातेवाईकांसाठी वैद्यकीय सेवा पुरवणे, तसेच गरजू मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शैक्षणिक अडचणी दूर करणे, असे उपक्रम या फाऊंडेशनतर्फे राबविण्यात येतात. मोफत आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, असे विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात येतात. या फाऊंडेशनच्या सहयोगातून महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सामान्य परिस्थितीतून उत्तुंग यश संपादन केलेल्या नऊ महिलांचा यथोचित सन्मान केला जाणार आहे. सांगलीवाडीतील कस्तुरी सभासदांसाठी खास गेम्स आणि बक्षिसांची पर्वणी असणार आहे. सांगलीवाडीतून कस्तुरी सभासद होणार्या महिलांसाठी आकर्षक गिफ्ट असणार आहेत.
कस्तुरी क्लबकडून तीन कप्प्यांचा बॉस कंपनीचा टिफिन, हनुमान ज्वेलर्स आणि गजराज ज्वेलर्स यांच्याकडून वन ग्राम ज्वेलरी, शिवाय फ्री गिफ्ट कूपन आणि खास सांगलीवाडीतील कस्तुरी सभासदांसाठी हिंदवी जनसेवा फाऊंडेशनकडून ट्रॅव्हल बॅग मिळणार आहे. तरी इच्छुक महिलांनी त्वरित सभासद नोंदणी करावी. संपर्क 9657817077 , 7020767465