सांगली जिल्हा परिषद  
सांगली

Sangli News : झेडपीत 1 एप्रिल रोजी सभापतींच्या निवडी

आघाडीतील हालचालींवर भाजपची ‌‘नजर‌’

पुढारी वृत्तसेवा

सांगली ः जिल्हा परिषदेत विषय समितींच्या सभापती निवडी एक एप्रिल रोजी होणार आहेत. पीठासीन अधिकारी तथा मिरजेचे उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे यांनी तशी नोटीस सोमवारी काढली. आघाडीच्या नेत्यांकडून तसेच ऐनवेळी गेम पलटविण्यासाठी भाजपकडून रणनीती आखली जात आहे.

जिल्हा परिषदेत काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना (उबाठा) पक्ष एकत्र येत सत्ता स्थापन केली. आता सभापती पदांसाठी इच्छुकांची संख्या मोठी असल्याने अंतर्गत चुरस आहे. त्यामुळे इच्छुकांची नाराजी दूर ठेवत संतुलन साधण्यासाठी नेत्यांची कसरत होणार आहे. सभापती निवडीत तरी आघाडीमध्ये मतभेद निर्माण होतील का, याकडे युतीच्या नेत्यांची ‌‘नजर‌’ आहे.

निवडीचा कार्यक्रम...

1 एप्रिल - सकाळी 11 ते 12 या वेळेत अर्ज दाखल

दुपारी 12 ते 12.30 या वेळेत अर्जाची छाननी

दुपारी 12.30 ते 1 वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत दुपारी 2 वाजता सभा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT