सांगली

Sangli Zilla Parishad : पंचायतराज; सांगली जिल्हा परिषदेस दोन कोटीचे बक्षीस

राज्यात तिसरा क्रमांक; नाशिक येथील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्याहस्ते गौरव

पुढारी वृत्तसेवा

सांगली : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये सांगली जिल्हा परिषदेने राज्यात तृतीय क्रमांक पटकावत दोन कोटी रुपयांचे बक्षीस मिळवले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांच्या समन्वयातून जिल्ह्याने हे यश संपादन केले आहे.

नाशिक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे व शशिकांत शिंदे यांचा सन्मानचिन्ह व बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे आणि शालेय शिक्षणमंत्री दादासाहेब भुसे उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास, ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण, पारदर्शक प्रशासन आणि लोकसहभाग वाढवण्यासाठी हे अभियान राबवले जाते. या अभियानांतर्गत ग्रामपंचायतींच्या कामगिरीचे सात प्रमुख घटकांच्या आधारे मूल्यमापन करण्यात आले.

ग्रामीण विकासाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य वापर, स्वच्छता, पाणीपुरवठा, पर्यावरण संवर्धन आणि ग्रामस्थांचा सहभाग या बाबींना अभियानात विशेष महत्त्व देण्यात आले. प्रशासनासोबतच लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांच्या या सामूहिक प्रयत्नांमुळे जिल्ह्याच्या कामगिरीला बळ मिळाले.

जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता पाटील, उपाध्यक्ष ऋषिकेश लाड तसेच सर्व सभापती आणि जिल्हा परिषद सदस्यांनी या यशाबद्दल अधिकारी, कर्मचारी आणि अभियानात सहभागी झालेल्या सर्व घटकांचे कौतुक केले आहे. राज्यस्तरावर मिळालेला हा तृतीय क्रमांक आणि दोन कोटी रुपयांचे बक्षीस म्हणजे जिल्ह्यातील पंचायतराज संस्थांच्या सामूहिक प्रयत्नांचे मोठे फलित मानले जात आहे. या यशाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण, लोकाभिमुख प्रशासन, मूलभूत सुविधा आणि शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर अधिक भर देण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT