Job Scam Pudhari
सांगली

Sangli Job Scam: जिल्हा परिषदेत नोकरीच्या आमिषाने १६ लाखांचा गंडा

तीन संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

​सांगली : सांगली जिल्हा परिषदेच्या बांधकाम व ग्रामीण पाणीपुरवठा विभागात कनिष्ठ अभियंता पदावर सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका महिलेची १६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी संजयनगर पोलिस ठाण्यात तीन संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संजयनगर येथील रहिवासी स्नेहल सुरेश पाटील (वय ३१) यांनी या संदर्भात पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे २०२३ पासून हा फसवणुकीचा प्रकार सुरू होता. संशयित विजय भोईर (रा. कल्याण, मुंबई), दिलीपसिंह आनंदराव पवार (वय ५८, रा. मयूर हाऊसिंग सोसायटी, मिरज) आणि महादेव रामचंद्र पाटील (वय ५८, रा. कवलापूर, ता. मिरज) या तिघांनी संगनमत करून फिर्यादी व त्यांच्या पतीचा विश्वास संपादन केला.

जिल्हा परिषदेच्या बांधकाम व ग्रामीण पाणीपुरवठा विभागात कनिष्ठ अभियंता पदावर नक्की नोकरी लावून देतो, असा दावा करत संशयितांनी वेळोवेळी फिर्यादीकडून एकूण १६ लाख रुपये उकळले. मात्र, प्रदीर्घ कालावधी उलटूनही नोकरी न मिळाल्याने तसेच दिलेले पैसे परत देण्यास संशयितांकडून टाळाटाळ होऊ लागल्याने फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसात तक्रार दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT