सांगली जिल्हा परिषद  
सांगली

Sangli News : जागा वापरणाऱ्या थकबाकीदारांना नोटिसा

भाडे थकविणाऱ्या कार्यालयांवर कारवाईचे संकेत; वसुलीसाठी प्रशासनाची धडक मोहीम

पुढारी वृत्तसेवा

सांगली : जिल्हा परिषदेच्या मोक्याच्या जागा वर्षानुवर्षे वापरूनही भाडे न भरणाऱ्या शासकीय, निमशासकीय आणि संस्थात्मक कार्यालयांना अखेर नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. थकीत भाडे तातडीने जमा करण्याच्या सूचना या नोटिसांद्वारे देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता पाटील आणि उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांनी दिलेल्या आदेशानंतर प्रशासनाने ही कारवाई सुरू केली आहे.

जिल्हा परिषदेच्या आवारातील अनेक जागा विविध कार्यालयांना भाडेतत्त्वावर वापरण्यास देण्यात आल्या आहेत. त्यातील काही कार्यालयांकडून नियमित भाडे भरले जाते. मात्र, अनेक कार्यालयांनी अनेक वर्षांपासून भाडे भरले नसल्याचे स्थायी समितीच्या बैठकीत समोर आले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेचे मोठे उत्पन्न थकले आहे. जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढविण्यासाठी नव्या पदाधिकाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागा आणि त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नाचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी भाडे थकविणाऱ्या कार्यालयांची यादी समोर आली.

याबाबत स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर संबंधित कार्यालयांना नोटिसा बजावण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार थकबाकीदार कार्यालयांना नोटिसा देण्यात आल्या असून, थकीत रक्कम भरण्याबाबत कार्यवाही सुरू झाली आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे भाडे न भरणाऱ्या कार्यालयांकडून आता किती थकबाकी वसूल होते, याकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT