Sangli Zilla Parishad 
सांगली

Sangli News : अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे नाराजी

जलव्यवस्थापन, स्वच्छता समितीची बैठक; उपस्थिती अनिवार्य करण्याचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

सांगली : जिल्हा परिषदेत झालेल्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीच्या मासिक बैठकीला काही अधिकारी अनुपस्थित राहिल्याने अध्यक्षा संगीता पाटील आणि उपाध्यक्ष ऋषिकेश लाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बैठकीला संबंधित अधिकाऱ्यांनी अनिवार्यपणे उपस्थित राहावे, अशा सक्त सूचना यावेळी देण्यात आल्या.

अध्यक्षा संगीता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस उपाध्यक्ष ऋषिकेश लाड, महिला व बालकल्याण सभापती स्नेहल मोरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती सावित्री रवी-पाटील, सदस्य जयदीप भोसले, राजेश्वरी नाईक, वैशाली मुळीक उपस्थित होते. मात्र, या बैठकीला काही अधिकारी नव्हते.

राज्य शासनाच्या विविध विभागांतील अधिकाऱ्यांनी समितीच्या बैठकीस उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यामुळे यापुढे संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीसाठी सक्त पत्र देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. तसेच बैठकीला गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांबाबत गांभीर्याने दखल घेऊन, पुढील बैठकीपासून संबंधित अधिकाऱ्यांनी अनिवार्यपणे उपस्थित राहावे, अशा सूचना देण्यात आल्या.

बैठकीतील निर्णय...

  • शिराळा तालुक्यातील बिबट्याचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पिंजरे लावण्याच्या सूचना वन विभागाला देण्यात आल्या.

  • रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना नियमानुसार लाभ मिळवून देण्याची कार्यवाही करण्यासही सांगण्यात आले.

  • गव्यांसाठी वन विभागाने चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी सदस्यांनी केली.

  • 'गाळमुक्त तलाव, गाळयुक्त शिवार' उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व तालुक्यांना परिपत्रक काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT