Sangli ZP 
सांगली

Sangli ZP Teacher Awards: १३ शिक्षकांचा होणार सन्मान

जिल्हा परिषदेचे शिक्षक पुरस्कार जाहीर; तालुकानिहाय १०, विशेष गुणवंत तीन शिक्षक

पुढारी वृत्तसेवा

सांगली : शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला रात्री उशिरापर्यंत झालेल्या खलबतानंतर अखेर जिल्हा परिषदेच्या जिल्हा शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या जिल्हा शिक्षक पुरस्कार २०२६ साठी जिल्ह्यातील १३ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये तालुकानिहाय १० शिक्षक, तर तीन शिक्षकांची विशेष गुणवंत शिक्षक पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षा संगीता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा शिक्षक पुरस्कार निवड समितीची बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समितीचे सभापती ऋषिकेश लाड, मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे आणि निवड समितीचे सदस्य उपस्थित होते.

प्राप्त प्रस्ताव आणि त्यातील गुणांकनाच्या आधारे पात्र शिक्षकांचे प्रस्ताव निवड समितीसमोर सादर करण्यात आले. शासनाने निश्चित केलेल्या निकषांनुसार गुणांकन करून पात्र शिक्षकांची सर्वानुमते निवड करण्यात आल्याचे प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे. शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर पुरस्कारांची घोषणा झाल्याने निवड झालेल्या शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मान्यवरांच्याहस्ते लवकरच या शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे.

पुरस्कारप्राप्त शिक्षक...

तालुकानिहाय पुरस्कार :

नीलेश जयपाल कांबळे (मिरज), धनाजी लक्ष्मण केंगार (आटपाडी), सोमनाथ मधुकर शिंदे (खानापूर), मायादेवी राजेंद्र कोष्टी (तासगाव), शैलजा अशोकराव चव्हाण (पलूस), अमगोंडा शिवाप्पा हुबनूर (जत), विश्वनाथ पांडुरंग सांगोळकर (कवठेमहांकाळ), लोचना जगन्नाथ धनवडे (कडेगाव), अशोक तातोबा घागरे (शिराळा) आणि सचिन शंकर फल्ले (वाळवा).

विशेष गुणवंत शिक्षक पुरस्कार :

रमेश रामचंद्र वायदंडे (मिरज), कल्पना संभाजी सावंत (जत) आणि आफियाबेगम इमामुद्दीन सिद्दीकी (वाळवा).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT