Crime News pudhari photo
सांगली

Sangli News : ग्रामसभेत प्रश्न विचारल्याच्या रागातून तरुणाला मारहाण

वंजारवाडीतील घटना; ठेकेदारावर तासगाव पोलिसांत गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

तासगाव : ग्रामसभेत सतत प्रश्न विचारतो या कारणावरून वंजारवाडी (ता. तासगाव) येथील एका तरुणाला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी बजरंग बाळासो चव्हाण (वय ३३, रा. वंजारवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ठेकेदार शहाजी अंतू खरमाटे याच्यावर तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत गावामध्ये सुरू असलेल्या विविध कामांबाबत चव्हाण यांनी प्रश्न विचारले होते. या वेळी गावातील कामांचा ठेकेदार शहाजी खरमाटे तिथे उपस्थित होता. ग्रामसभेत प्रश्न विचारल्याच्या रागातून त्याने चव्हाण यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला होता.

दरम्यान, शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास चव्हाण हे वंजारवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवीन मतदार नोंदणीबाबत विचारपूस करण्यासाठी गेले होते. त्या वेळी तेथे उपस्थित असलेल्या शहाजी खरमाटे याने 'याला माहिती द्यायची काय गरज आहे' असे म्हणत चव्हाण यांच्याशी वाद घातला. 'तू ग्रामपंचायतीमध्ये जास्त प्रश्न विचारतोस, लय शहाणा झालास काय?' असे म्हणत त्याने चव्हाण यांना शिवीगाळ करून मारहाण केली.या प्रकरणी तासगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT