Gold stolen  Pudhari
सांगली

Gold Robbery: देवराष्ट्रेत कोयत्याचा धाक दाखवून महिलेचे सोने लुटले

पाणी पिण्याच्या बहाण्याने चोरट्यांचा घरावर डल्ला

पुढारी वृत्तसेवा

देवराष्ट्रे : देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे मंगळवारी पहाटे पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात शिरलेल्या दोन चोरट्यांनी कोयता व खुरप्याचा धाक दाखवून महिलांचे दागिने लुटले.

मिळालेल्या माहितीनुसार, देवराष्ट्रे येथील कुंभारगाव रोडलगत बाबूराव बलभीम सुतार यांचे घर आहे. सुतार हे आपली आई, पत्नी व दोन मुलांसह राहतात. मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास बाहेरून आवाज आल्याने सुतार यांनी दरवाजा उघडला. यावेळी दरवाजाबाहेर असलेले दोघे पाणी पिण्याचा बहाणा करीत सुतार काही समजायच्या आत घरात घुसले.

चोरट्यांनी घरातीलच कोयता आणि खुरपे घेऊन सुतार यांच्या गळ्याला लावले. त्यानंतर त्यांनी झोपलेल्या सुतार यांच्या आईच्या गळ्यातील बोरमाळ हिसकावण्याचा प्रयत्न केला. आवाजामुळे सुतार यांच्या पत्नीला जाग आली. त्यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला असता, एका चोरट्याने ‌‘ओरडू नको, नाहीतर नवऱ्याला मारून टाकीन‌’ अशी धमकी दिली. चोरट्यांनी सुतार यांच्या पत्नीच्या गळ्याला खुरपे लावून मंगळसूत्र हिसकावले आणि आईच्या कानातील कर्णफुलेही काढून घेतली.

अंदाजे 13 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले. चोरटे निघून गेल्यानंतर सुतार यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी सुतार यांच्या तक्रारीनुसार पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT