Cyber Crime Cases pudhari photo
सांगली

Sangli crime: विवाहितेचा ईमेल वापरून पॉर्न साईटवर खाते उघडले

संशयिताविरुद्ध संजयनगर पोलिसांत गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

सांगली : एका विवाहित महिलेच्या ईमेल आयडीचा गैरवापर करून पॉर्न साईटवर तिचे बनावट खाते उघडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महिलेला मेसेज पाठवून धमकावल्याबद्दल साहिल अब्बास शेख (वय 26, रा. सटाले मळा, मंगळवार बाजारजवळ, सांगली) याच्याविरुद्ध संजयनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित साहिल आणि पीडित महिला एकमेकांच्या परिचयाचे आहेत. मार्च महिन्यात साहिलने पीडितेचा ईमेल आयडी मिळवला होता. त्यानंतर पीडितेच्या संमतीशिवाय त्याने तांत्रिक कौशल्याचा वापर करून तिच्या ईमेलवरून दोन ऑनलाईन पॉर्न साईटवर तिच्या नावे खाते उघडले.

या कृत्यानंतर संशयिताने या समाजमाध्यमावरून पीडितेला मेसेज पाठवला. ‌‘तू माझ्याशी संबंध ठेव, नाही तर मी तुझ्या पतीला भेटून तुझे सर्व फोटो आणि व्हिडीओ दाखवीन‌’, अशी धमकी त्याने मेसेजद्वारे दिली. या प्रकारानंतर पीडितेने गुरुवारी सायंकाळी संजयनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन साहिल शेखविरुद्ध फिर्याद दिली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, सायबर गुन्ह्यांतर्गत अधिक तपास सुरू केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT