Crime News Pudhari Photo
सांगली

Sangli Crime| करगणीत महिलेवर खोऱ्याने हल्ला

मुलींसह महिलेलाही लाथा-बुक्क्यांनी मारहाण

पुढारी वृत्तसेवा

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील करगणी येथे किरकोळ वादातून झालेल्या हाणामारीत महिलेच्या डोक्यात लोखंडी खोऱ्याच्या दांडक्याने हल्ला करून त्यांना जखमी करण्यात आले. या प्रकरणी तीन महिलांविरोधात आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत संगीता दगडू चव्हाण (वय ४०, रा. करगणी, ता. आटपाडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास फिर्यादी संगीता चव्हाण या आपली मुलगी ज्योती हिला बसस्थानकावर सोडण्यासाठी जात असताना, वैष्णवी नलवडे यांच्या घरासमोर हा प्रकार घडला.

फिर्यादी संगीता आणि संशयित वैष्णवी नलवडे यांच्यात यापूर्वीही किरकोळ कारणावरून वाद झाले होते. घटनेच्यावेळी वैष्णवी नलवडे हिने फिर्यादी व त्यांच्या मुलीला पाहून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. याबाबत जाब विचारला असता, संतापलेल्या वैष्णवीने हातातील लोखंडी खोऱ्याच्या दांडक्याने संगीता चव्हाण यांच्या डोक्यात मारहाण केली. यावेळी सोबत असलेल्या शोभा राजू पवार आणि शुभांगी धनाजी नलवडे यांनीही फिर्यादीला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, भांडण सोडवण्यासाठी आलेल्या ज्योती चव्हाण आणि जया तानाजी चौगुले यांनाही शिवीगाळ करत, ‘तुम्हाला जिवंत सोडत नाही,’ अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी वैष्णवी शुभम नलवडे, शोभा राजू पवार आणि शुभांगी धनाजी नलवडे (सर्व रा. करगणी) यांच्याविरोधात आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT