सांगली

Sangli Power Outage: सांगली 4 तास अंधारात

विद्युत वाहिनी तुटली; नागरिक उकाड्याने हैराण

पुढारी वृत्तसेवा

सांगली : विश्रामबाग येथील 33 के.व्ही.ची विद्युत वाहिनी तुटल्याने विश्रामबाग वगळता संपूर्ण सांगली शहर मंगळवारी चार तासांहून अधिक काळ अंधारात बुडाले. रात्री साडेदहापर्यंत या वाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यात उकाड्याचे दिवस असल्याने सांगलीकर चांगलेच हैराण झाले होते.

विश्रामबाग ते गव्हर्न्मेंट कॉलनीकडे जाणारी 33 के.व्ही. वाहिनी मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास अचानक तुटल्याने शहरातील कोल्हापूर रोड, खणभाग, नदीकडेचा भाग आणि शंभरफुटी उपकेंद्रातील विद्युतपुरवठा पूर्णपणे खंडित झाला. त्यामुळे विश्रामबाग वगळता शंभरफुटी, गावभाग, पेठभाग, खणभाग, कोल्हापूर रोड, दत्त-मारुती रोड, हरभट रोड परिसरात सायंकाळी साडेसात वाजल्यापासून अंधार पसरला होता.

वीज वितरणने याची तत्काळ दखल घेत विश्रामबाग येथील वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT