ईश्वरपूर : आष्टा रस्त्यावरील शेतकरी उद्यान परिसरातील घरांमध्ये नाल्याचे पाणी शिरले.  
सांगली

Sangli Rain : सांगलीत पावसाच्या तुरळक सरी

तापमानात पाच अंशांनी घट; धरणांतील पाणी साठा ओसरु लागला

पुढारी वृत्तसेवा

सांगली : शहर परिसरात बुधवारी पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. आठ दिवसापासून वाढलेले तापमान तब्बल पाच अंशाने कमी झाले. बुधवारी शहराचे कमाल तापमान ३३, तर किमान तापमान २४ अंश सेल्सियस राहिले. धरणातील पाणीसाठा कमी होत चालला असून, वारणा धरणात बुधवारी १२.९५ टीएमसी पाणी साठा होता.

आठ दिवस शहराचे तापमान वाढले होते. मंगळवारपासून ढगाळ वातावरण आहे. बुधवारी दुपारी आणि सायंकाळी साडे चारच्या सुमारास शहर परिसरात तुरळक पावसाच्या सरी झाल्या. हा वादळी पाऊस असल्याची माहिती कृषी विभागाच्यावतीने देण्यात आली. आणखी दोन दिवस तुरळक पाऊस होईल, अशी शक्यता आहे.

यंदा उन्हाळी पाऊस कमी झाल्याने धरणातील पाणी साठा कमी होत चालला आहे. जिल्ह्यातील वारणा धरणात बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत १२.७७ टीएमसी पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता ३४.४० टीएमसी असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली.

सांडवा, विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सुरू असलेला विसर्ग क्युसेकमध्ये याप्रमाणे- धोम ७६५. कण्हेर ४००, धोम बलकवडी ३१५, उरमोडी ४२५, तारळी ११८, वारणा १६००, राधानगरी ५००, दुधगंगा ७५०, तुळशी १००, कासारी २००, पाटगाव २९०, व अलमट्टी धरणातून ५०००

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT