सांगलीत जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर 
सांगली

Sangli Water Supply : सांगलीत जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर

मुख्य चौकात रस्ता खोदला; पाणीपुरवठा आज होणार सुरळीत

पुढारी वृत्तसेवा

सांगली : महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच भारती भवनसमोरील चौकात जलवाहिनीला सोमवारी सायंकाळी गळती लागल्याने पाणीपुरवठा विभागाची धावपळ उडाली. मंगळवारी जेसीबीच्या साहाय्याने जलवाहिनीजवळील रस्ता खोदून दुरुस्ती सुरू करण्यात आली. युद्धपातळीवर काम सुरू असून, बुधवारी सकाळपर्यंत दुरुस्ती पूर्ण करण्याचे नियोजन पाणीपुरवठा विभागाने केले आहे.

मुख्य चौकात जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू असल्याने या मार्गावरील एकेरी वाहतूक वळविण्यात आली. वाहतूक शाखेचे पोलिस कोंडी टाळण्यासाठी दिवसभर कार्यरत होते. महापालिकेच्या दारातच मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने प्रशासनाची यंत्रणा कामाला लागली. जलवाहिनी हिराबाग पाण्याच्या टाकीकडे जाणारी मुख्य वाहिनी आहे. मंगळवारी रात्री नऊ वाजल्यानंतर दुरुस्तीचे मुख्य काम हाती घेण्याचे नियोजन करण्यात आले. दुरुस्ती कामाची चाचणी यशस्वी झाल्यानंतर पाणीपुरवठा सुरळीत होईल. बुधवारी गावभाग, खणभाग, कॉलेज कॉर्नर, कोल्हापूर रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड यासह परिसरातील भागांना अपुरा पाणीपुरवठा होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT