Child Marriage  Pudhari
सांगली

Sangli Child Marriage Case: वाळव्यात अल्पवयीन मुलीचा विवाह

गर्भवती राहिल्यानंतर घटना उघडकीस, आष्टा पोलिसांत पाच जणांवर गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

​आष्टा : वाळवा येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही पीडित मुलगी गर्भवती असल्याचे तपासणीत स्पष्ट झाल्यानंतर पती, सासू-सासरा आणि मुलीच्या आई-वडिलांसह एकूण पाचजणांवर आष्टा पोलिस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती वैभव बाजीराव बनसोडे (वय २५), सासरा बाजीराव बाबुराव बनसोडे (वय ४५), सासू त्रिशाली बाबुराव बनसोडे (वय ४०, तिघेही रा. भादोले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) तसेच मुलीचे वडील धनाजी सर्जेराव वायदंडे (वय ४६) व आई गीता सर्जेराव वायदंडे (वय ४०, दोघेही रा. नवीन वसाहत, वाळवा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर जिल्ह्यातील भादोले (ता. हातकणंगले) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ही अल्पवयीन मुलगी वैद्यकीय तपासणीसाठी गेली होती. त्यावेळी ती गर्भवती असल्याचे समोर आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबतचा अहवाल भादोले ग्रामपंचायत कार्यालयाकडे सुपूर्द केला. यानंतर ग्रामपंचायत अधिकारी आसमा आसिफ मुल्लाणी यांनी सरकारतर्फे वडगाव (ता. हातकणंगले) पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT